पाणीकपातीचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:45 AM2019-06-25T01:45:38+5:302019-06-25T01:45:59+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

 Water decision today | पाणीकपातीचा आज फैसला

पाणीकपातीचा आज फैसला

Next

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा पंधरा टक्के साठा शिल्लक आहे. शिवाय अन्य दोन साठवण धरणातूनदेखील पाणी सोडल्यानंतर ते मिळण्याची शक्यता कमी असल्याने अखेरीस पाणीकपातीच्या निर्णयाप्रत महापालिका आली आहे. प्रशासनाने यासंदर्भात मंगळवारी (दि.२५) महासभेत प्रस्ताव मांडला आहे. त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेची धोरणात्मक निर्णयासाठी तहकूब झालेली महासभा मंगळवारी (दि.२५) सकाळी होणार आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक वादाचे विषय असले तरी शहरवासीयांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा विषय पाणी कपातीचा असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पाणीसाठा कमी होत आहे. पाऊसदेखील लांबल्याने आता नाशिककरांच्या तोंंडचे पाणी पळाले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी असले तरी धरणातून महापालिकेच्या जलविहिरीपर्यंत पाणी येण्यात खडकाचा अडथळा आहे. महापालिकेने याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, हे काम वेळेत होईल किंवा नाही अशी शंका आहे, त्याचबरोबर दारणा धरणातून प्रदूषित पाणी बंद झाल्यानेदेखील महापालिकेची अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवारी (दि.२२) महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळीच पाणीकपातीच्या अनुषंघाने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.
पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यानुसार ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होतो तेथे एकवेळ आणि एकवेळ पाणीपुरवठा असलेल्या ठिकाणी काही प्रमाणात कपात करण्याचे नियोजन आहे.
कपातीऐवजी हवा निर्जला दिन
प्रशासनाच्या वतीने दोन पर्याय देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोरडा दिवस किंवा निर्जला दिन करण्यावर भर आहे. एका दिवसात पाणीकपात झाल्यास साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणी एकाच दिवसात वाचत असल्याने प्रशासनाच्या मतानुसार हाच प्रस्ताव योग्य आहे. मात्र, यापूर्वी एकदा कोरडा दिवस ठेवला की दुसºया दिवशी जलवाहिन्या कोरड्या असतात. त्या भरण्यासाठी वेळ जात असल्याने कोरडा दिवसाच्या दुसºया दिवशीदेखील नागरिकांना कमी पाणीपुरवठा होत असल्याने अडचण निर्माण होते. त्यामुळे सहसा नगरसेवक त्यासाठी राजी होत नाही.
कटू निर्णय लोकप्रतिनिधींच्या माथी
मनपात पाणीकपातीचे अधिकार खरे तर प्रशासकीय असून, ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्तच घोषित करीत असतात. हा कटू निर्णय असल्याने लोकप्रतिनिधींच्या गळी मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

Web Title:  Water decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.