जिल्हाधिकारी कार्यालयात पाण्याचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:22 AM2018-02-25T01:22:49+5:302018-02-25T01:22:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यासाठी समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांतून येणाºया नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब जिल्ह्याधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यासाठी समता परिषदेतर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन देत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील हजारो नागरिक रोज वेगवेगळ्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. अनेकदा अधिकाºयांची वेळत भेट न होणे कार्यालयात येणाºया नागरिकांची गर्दी यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात बसून राहावे लागते. परंतु, उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होऊनही जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या भागातून येणाºया नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब समता परिषदेच्या तेजस शेरताटे, संतोष लाटे, राकेश महाजन, गणेश डावरे, सौरभ शेरताटे आदींना जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन लक्षात आणून देत जिल्हाधिकारी आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पाण्यासाठी मोजावे लागतात पैसे
अनेक नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील शीतपेयांच्या स्टॉल्सवर तहान भागविण्यासाठी जावे लागते. अनेकदा येथेही केवळ पाणी मिळत नसल्याने त्यांना अगोदर पैसे खर्चून शीतपेय घेऊन नंतरच तहान भागविण्यासाठी पाणी मिळते. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाºया नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच पिण्याचे स्वच्छ पाणी उलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.