वटार येथील हत्ती नदीला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:26 PM2019-08-04T23:26:10+5:302019-08-04T23:26:34+5:30
वटार : परिसरातील गावांना शेती सिंचनासाठी महत्त्वाची असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
वटार : परिसरातील गावांना शेती सिंचनासाठी महत्त्वाची असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सुरु वातीला दीड महिना पावसाने ओढ दिल्याने परिसरातील बळीराजा धास्तावला होता. पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते, जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत होते. पण सुरु वातीला रिमझिम आणि नंतर जोरदार पावसाने परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हत्ती नदीच्या उगम म्हणजे पठावा धरण परिसरात हजेरी लावल्याने नदी-नाले भरून वाहू लागले आहेत.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हत्ती नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.