जनावरांसाठी पाण्याचीमाजी विद्यार्थ्यांकडून सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:49 IST2021-05-09T21:12:29+5:302021-05-10T00:49:56+5:30
येवला : येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टू गेदरचा खर्च टाळून यंदा शहरातील भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

जनावरांसाठी पाण्याचीमाजी विद्यार्थ्यांकडून सोय
ठळक मुद्देशहरातील भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
येवला : येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टू गेदरचा खर्च टाळून यंदा शहरातील भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
जनता विद्यालयातील सन २००२ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गेट-टुगेदरचा खर्च टाळून शहरातील भटक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ठिकठिकाणी सिमेंटच्या कुंड्या ठेवल्या. यात नियमीत पाणी भरले जाणार असल्याचे ग्रुप अध्यक्ष चेतन लोणारी यांनी सांगितले.