अंदरसुल भागात पाणी-चारा टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:12 PM2019-03-14T18:12:12+5:302019-03-14T18:12:28+5:30
अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे. गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
अंदरसुल : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाण्याची जनावरांना चारा पाणी याची टंचाई निर्माण झाली आहे अंदरसुल गावात आठ दिवसाने पिण्यासाठी पाणी मिळत आहे वाड्या वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने जनावरांना व शेतकऱ्यांना पाणी टंचाई निर्माण झालीआहे.
गावाच्या पालखेड कालवा लाभक्षेत्रात देखील आज वाड्या-वस्त्यावर पाणी नाही उत्तरेकडील सायगाव पांजरवाडी अंगुलगाव भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी सुरेगावरस्ता गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा केल्याल्या गावात ग्रामपंचायतींना पाणीपट्टी देखील परवडत नसली तरी पाणी घेणे या बिकट टंचाई मध्ये क्र मप्राप्त आहे. पालखेड डावा कालव्याचे पाणी येवला व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मिळणार आहे.
शासनाने तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल व कोळगंगा नदी मधील बोकटे गावापर्यंत असणारे सर्व बंधारे भरली जाणार असल्याचा आदेश जारी केल्याने या भागातील नागरिकांना पाणी आल्यास समाधान होऊन पाणी टंचाई शिथील होऊ शकते कारण नदीपात्रातून पाणी गेल्यास आजूबाजूच्या विहिरींना पाणी उतरू शकते.
नदीकाठावरील गावातील नागरिकांना तसेच जनावरांसाठी याचा उपयोग होणार असल्याने कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा लोक करीत आहेत अपुऱ्या पाण्यामुळे या वर्षी अंदरसुल व पूर्वभागात गहू, हरभरे याची लागवड कमी झाली आहे.