खोकरतळे अन‌् एकदेरे गावात जलोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:17 PM2020-12-28T16:17:23+5:302020-12-28T16:30:26+5:30

पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेत, सर्व पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले.

Water festival in Khokartale and Ekdere village | खोकरतळे अन‌् एकदेरे गावात जलोत्सव

खोकरतळे येथे पाणी योजनेचा शुभारंभ करतांना खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, भास्कर गावीत, प्रमोद गायकवाड, विलास अलबाड, तुळशिराम वाघमारे, महेश टोपले,संजय वाघ, चंद्रभागा मोंढे आदी.

Next
ठळक मुद्देलोकार्पण : दोन गावांतील लोकांच्या दारात पाणी

पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेत, सर्व पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले.

खोकरतळे येथील महिलांना दीड-दोन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे जलपुरवठा योजनेद्वारे गावात पाणी आणून टाकी बांधण्यात आली. एकदरे गावात दूषित पाण्याची समस्या होती. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून ही समस्या सोडविण्यात आली.
लोकार्पण कार्यक्रमासाठी जि.प. सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ.जयदीप निकम, प्रशांत बच्छाव, डॉ.अमोल अन्नदाते, हर्षल विभांडीक, गंधार विभाडीक, तुळशीराम वाघमारे, संजय वाघ, पुंडलिक महाले, महेश टोपले, त्र्यंबक कामडी, रघूनाथ चौधरी, रामदास भोये, संकेत नेवकर, रमेश गालट, सुरेश पवार, रमेश दरोडे, सरपंच चंद्रभागा मोंढे, तुकाराम सापटे, मनोहर मोंढे, निवृत्ती सापटे, पद्माकर कामडी, संदिप बत्तासे, दिलीप चौधरी, हरिदास गडदे, विजय भरसट, राहुल गाडगीळ, ग्रामसेवक उज्ज्वला वरपे, देविदास धूम, भूषण लोहार, चंद्रकांत जाधव, एन.व्ही. सोनवणे, जगन्नाथ गवळी, व्यंकट कदम, शाखा अभियंता जे.पी. जाधव आदींसह खोकरतळे व एकदरेचे ग्रामस्थ उपस्थितीत होते.

दोन्ही गावांतील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद अनुभवताना समाधान वाटले. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या समाधानातच सारे काही मिळाले.
- डॉ. विनय सहस्त्रबुद्धे.

खोकरतळे योजनेविषयी ...
पेठ पासून ८ किलोमीटरवर वसलेल्या खोकरतळ्यात इतर अनेक गावांसारखीच पाण्याची समस्या होती. २००६ साली एका योजनेंतर्गत डोंगराखाली असलेल्या जागेवरून पाइपलाइन केली गेली. हे पाणी गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील कोरड्या विहिरीत टाकले गेले. तेंव्हापासून गावातील महिलांना दररोज इतके अंतर पायपीट करून विहिरीत टाकलेले पाणी डोक्यावरून आणावे लागत होते. आता हे पाणी गावापर्यंत आले आहे.

एकदरे योजनेविषयी...
शासकीय योजनेतून एकदरे या गावी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेली आहे. मात्र या गावात दूषित पाणी पुरवठ्याची मोठी समस्या होती. हे पाणी पिल्याने साथीच्या आजारांचे प्रमाणही खूप होते. यावर उपाय म्हणून एकदरे येथे अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली.

 

Web Title: Water festival in Khokartale and Ekdere village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.