नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:41+5:302021-08-29T04:16:41+5:30

एस. बी. कमानकर सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे ...

Water in the field due to siltation in Nandurmadhameshwar dam | नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी शेतात

Next

एस. बी. कमानकर

सायखेडा : नांदुरमधमेश्वर धरणात गाळ साचल्याने पाणी थेट शेतात जात असल्याने गोदाकाठ परिसरात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. गाळ काढण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

गोदाकाठ भागातील जमीन दरवर्षी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली पिके खराब होतात. काळी कसदार जमीन आणि नदीलगतचा भाग यामुळे पाणी अनेक महिने शेतात राहाते, त्यामुळे शेती आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गोदावरी नदीच्या आसपास असणाऱ्या सखोल भागात पाणी जाऊन शेतीचे नुकसान होण्याची घटना ही एक किंवा पाच वर्षांची समस्या नाही तर ती अनेक दशके निरंतर निर्माण होणारी समस्या असूनही ती का निर्माण होते आणि त्यासाठी काय प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यावर अभ्यास करून उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे; मात्र केवळ गोदावरी नदीला येणारा पूर आणि त्यापासून होणारे तात्पुरते नुकसान या संदर्भात वरवर मलमपट्टी करून समाधान व्यक्त केले जात आहे.

गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. चांगला पाऊस झाला तर वर्षातून दोन किंवा तीन वेळा महापूर येतो. पुराच्या पाण्याने गोदाकाठ पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी नांदुरमधमेश्वर धरणावर सात वक्राकार गेट बसविण्यात आले. वक्राकार गेट झाल्याने काहीअंशी पाणी वाहून जाऊ लागले, पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला मात्र धोका टळला नाही. शेतीचे नुकसान जे व्हायचे ते होतच आहे. चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, सायखेडा, चांदोरी या गावांतील हजारो हेक्टर शेतीचे आजही नुकसान होत आहे.

-----

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केराची टोपली

धरणावर वक्राकार गेट उभारले; पण गेटच्या मागे धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी गेटजवळ लवकर आणि तितक्या वेगात जात नाही. गेटच्या उंचीपेक्षा गाळाची उंची जास्त आहे, त्यामुळे पाणी गेटजवळ न जाता ते नदीच्या पात्रात पसरते. यासाठी गेटच्या आतील बाजूला असणारा गाळ काढून पाणी गेटजवळ जाण्यासाठी येणारा अडथळा दूर केला तर पाणी जोरदार वाहून जाईल आणि शेतात पसरणार नाही. नदीत वाहत येणारे पाणी जोरात गेटपर्यंत पोहोचले तर शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान होण्याची समस्या दूर होईल.

यासंदर्भात शेतकरी, सामाजिक संघटना यांनी खासदार, आमदार, पालकमंत्री यांना अनेक वर्षं निवेदन देत आहे; पण प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

-------------------

चापडगाव, मांजरगाव, करंजगाव, शिंगवे, कोठुरे, चांदोरी, सायखेडा या गावांतील नदीलगत असलेल्या भागातील शेतात अनेक वर्ष सातत्याने पावसाळ्यात पाणी येते आणि शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान होते. नांदुरमधमेश्वर धरणाच्या गेटजवळ ज्या प्रवाहात पाणी जायला पाहिजे तितक्या प्रवाहात जात नाही.

- नीलेश दराडे, शेतकरी, चापडगाव (२८ सायखेडा वॉटर)

280821\28nsk_15_28082021_13.jpg

२८ सायखेडा वॉटर

Web Title: Water in the field due to siltation in Nandurmadhameshwar dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.