अखेर रामकुंडाजवळ चाचणीत आढळले पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:31 AM2020-12-16T04:31:27+5:302020-12-16T04:31:27+5:30
स्मार्ट सिटीच्यावतीने रामवाडी पूल ते टाळकुटे पुलापर्यंत प्रोजेक्ट गोदा राबवण्यात येत असून, त्याच वेळी दुतोंड्या मारोती ते गाडगे महाराज ...
स्मार्ट सिटीच्यावतीने रामवाडी पूल ते टाळकुटे पुलापर्यंत प्रोजेक्ट गोदा राबवण्यात येत असून, त्याच वेळी दुतोंड्या मारोती ते गाडगे महाराज पुलापर्यंत तळ काँक्रिटीकरण काढण्यात येत आहे. या रामकुंड परिसरात सतरा प्राचीन कुंड असून, ते पुनरुज्जीवित करावे, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हेाती. त्यानुसार हा विषय महापालिकेच्या पटलावर आल्यानंतर २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण विभागाचा सल्ला घेण्यात आला. या विभागाने रामकुंडाजवळ तीस मीटर अंतरावर ट्रायल बोअर घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कंपनीने सेामवारी (दि.१४)सायंकाळी अहिल्यादेवी कुंड येथे ट्रायल बेाअर घेतल्याने तेथे ६० फुटाच्या ट्रायल बेाअरला १.५ इंच पाणी लागल्याचे कंपनीने कळवले आहे.
दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा काँक्रिटीकरणामुळे श्वास कोंडला जात असल्याने गोदाप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. गोदावरी नदीतील काँक्रिटीकरण काढतानाच प्राचीन कुंड पुनरुज्जीवित करण्याची मागणी होत होती. स्मार्ट सिटीने हे काम सुरू केल्यानंतर अनामिक आणि दशाश्वमेध कुंड येथे पाणी आढळले होते. त्यानंतर आता अहिल्या कुंड येथेही पाणी आढळले आहे.
कोट..
गोदावरी नदी पात्रात जलस्रोत जिवंत स्थितीत असल्याचा पुरावा आहे. आता क्षणाचा विलंब न करता स्मार्ट सिटीने रामकुंडसहित उर्वरित बारा कुंडांचे सिमेंट-काँक्रिट तत्काळ काढावे.
~ देवांग जानी, याचिकाकर्ता.
----------------------------
छायाचित्र आर फोटोवर १५रामकुंड