अंबड मधील कारखान्यांमध्ये शिरले पाणी, कामगारांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 02:35 PM2019-08-04T14:35:33+5:302019-08-04T14:37:42+5:30
नाशिक :- रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने कामगारांना सुटी देण्यात आली.आणि उत्पादन प्रक्रि या ठप्प झाल्याने कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.महावितरणच्या कार्यालयात पाणी घुसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.

शनिवार आणि रविवारी झालेल्या कोसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा सर्वात मोठा फटका अंबड औद्योगिक वसाहतीला बसला.शनिवारी साप्ताहिक सुटी असल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. रविवारी मात्र उद्योजकांना संकटाला सामोरे जावे लागले. रविवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस असल्याने अंबडमधील कारखान्यांमध्ये जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. महागडी सीएनसी व्हीएमसी सारखी मशिनरी पाण्यात होती.पाण्यात विद्युत प्रवाह उतरु नये म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कामगारांना सुटी देण्यात आली होती.तर कारखान्यात साचलेले पाणी बाहेर काढावे कसे ? असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.दिवसभरासाठी उत्पादन प्रक्रि या बंद ठेवण्यात आल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तर कामगारांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.अंबड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) चे अध्यक्ष वरु न तलवार यांच्याही कारखान्यात पाणी घुसल्याने त्यांच्यावरही उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली.
अंबड औद्योगिक वसाहतीतील महावितरणच्या कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने सुरिक्षततेचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा काही कालावधीसाठी खंडित करण्यात आला होता.तर कार्यालयातील पाणी कसे काढावे यासाठी प्रयत्न केले जात होते.