विल्होळी तलावातील पाण्याची पातळी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:49 AM2018-05-07T00:49:39+5:302018-05-07T00:49:39+5:30
विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विल्होळी : येथील गौळाणा विल्होळी एमआय टॅँक अर्थात तलावातील पाण्याची पातळी घसरली असून, शेतकऱ्यांना आठवड्यातून तीनच दिवस पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विल्होळी तलावाच्या खालच्या बाजूस गाव व परिसरासाठी पाणीपुरवठा करणारी विहीर असून, पाणी कमी झाल्याने विहिरीला पाणी कमी येते. त्यामुळे विल्होळी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे खात्यास पत्र देण्यात आले आहे. व्यावसायिक तलावामधून अवैधरीत्या पाणी चोरत असल्याने पाण्याची पातळी कमी झाली असल्याचे काही शेतकºयांनी सांगितले. यावर अधिकारी अशोक दुगड यांना विचारणा केली असता, भूमिगत पाइपलाइन केल्याने अवैधरीत्या पाणीचोरी करणारे सापडत नसून शेतकºयांनी अशा बाबी लक्षात आणून दिल्यास पाणीचोरावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मार्च, एप्रिलमध्ये शेतकºयांना पूर्ण पाणी देण्यात आले, परंतु १ मेपासून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा लक्षात घेता शेतकºयांना आठवड्यामध्ये तीन दिवस पाणी देण्यात येणार आहे. पाण्याची पातळी घसरली असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी विल्होळी परिसरातील शेती येथील गौळाणे एमआय टँक या तलावावर अवलंबून आहे. विल्होळी येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येथूनच होते. परंतु काही व्यावसायिक सदर तलावातून गैरमार्गाने पाण्याचा उपसा करत असून सदर प्रकार थांबवावा, अशी प्रतिक्रि या शेतकºयांकडून उमटत आहे. सदर पाणीचोरीला आळा बसणे गरजेचे आहे.