राष्टय भोई समाज युवा मंचचे जलआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:37 AM2018-06-12T00:37:53+5:302018-06-12T00:37:53+5:30
राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते.
पंचवटी : राष्टय भोई समाज क्रांती दल महापरिवार, युवा मंच, महिला मंच, कर्मचारी परिषद तसेच मच्छीमार संघाच्या वतीने राष्टÑीय समाज युवा मंच राष्टÑीय अध्यक्ष नरेश उखंडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ११) सकाळी भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा तसेच अन्य विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीत पाण्यात उभे राहून तासभर जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भोई समाज पुरुष, महिला तसेच युवक व युवती सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता जुने नाशिक अमरधामरोडवरील श्री शितळादेवी मंदिर येथून पायी मोर्चाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा गंगाघाटावरील खंडोबा महाराज मंदिरापर्यंत नेण्यात येऊन नंतर भोई समाजाच्या बांधवांनी गोदावरी नदीत पाण्यात उतरून हमारी मांगे पुरी करो नही तो खुर्ची खाली करो, भोई समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. भोई समाजाच्या समस्या मांडणारा एकही आमदार तसेच खासदार नाही. त्यामुळेच समाजाच्या विविध अडचणी वाढत आहेत त्याची शासनाने दखल घ्यावी यासाठी हे जलआंदोलन करण्यात आले. राज्यभरात सुमारे ६० लाख भोई समाजबांधव असून, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर खैरमोडे, प्रदेश सरचिटणीस तुषार सोटोटे, उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष नीलेश शिवदे, जिल्हाध्यक्ष नीलेश वाडिले, युवा मंचचे महासचिव राजेश मोरे, कार्याध्यक्ष उत्तम घटमाळे, शहरअध्यक्ष सागर ठाकरे, महिला मंच उत्तर महाराष्टÑ अध्यक्ष सुजाता फुलपगारे, जिल्हाध्यक्ष धनश्री ढोले आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने या जलआंदोलनात सहभागी झाले होते.
शासनदरबारी समस्या मांडणार
भोई समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी परवानगी देऊन ठेकेदारी पद्धत रद्द करावी व महानगरपालिका क्षेत्रातील व इतर विभागांत वर्षानुवर्षे चने फुटाणे व मच्छीमार व्यवसाय करणारे अधिकृत करण्यात यावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले. भोई समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी आमदार सीमा हिरे यांनी आंदोनलकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्या शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन दिले.