कांदा पिकाला टँकर द्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:54 PM2018-10-29T15:54:10+5:302018-10-29T15:54:29+5:30

येवला : यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात पाठ फिरवली असून येवला तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून दुष्काळाच्या झळा जाणवत असताना विहिरी, हातपंप, बोअरवेल यांनी तर केव्हाच तळ गाठला असून कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी पाच एकर लागवड केलेली लाल कांदा पीक पाण्याअभावी सुकून चालली असताना कांदा पिकाला देण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून मागील तीन दिवसांपासून कांद्याला पाणी देऊन कांदा लागवड जगवण्याचा प्रयत्न करत आहे.

Water by onion crop tanker | कांदा पिकाला टँकर द्वारे पाणी

कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे टँकरद्वारे कांदा पिकाला पाणी देताना. 

Next
ठळक मुद्दे.तीनहजाररु पये मध्ये १ ट्रॉली चारा विकत मिळत असून मिळेल तेथून शेतकरी चारा उपलब्ध करून घेत आहे. दोन आवर्तन पालखेड कालव्यातून मिळाले नाही तर यंदा रब्बी हंगामातील पिके घेतली जाणार नसून ,पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण होण्यास येवला तालुक्यात सुरू झाल

येवला : यंदा पावसाने नाशिक जिल्ह्यात पाठ फिरवली असून येवला तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून दुष्काळाच्या झळा जाणवत असताना विहिरी, हातपंप, बोअरवेल यांनी तर केव्हाच तळ गाठला असून कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी पाच एकर लागवड केलेली लाल कांदा पीक पाण्याअभावी सुकून चालली असताना कांदा पिकाला देण्यासाठी मुबलक पाणी नसल्याने टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून मागील तीन दिवसांपासून कांद्याला पाणी देऊन कांदा लागवड जगवण्याचा प्रयत्न करत आहे.
खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी करपून गेली असल्याने झालेला खर्च देखील फिटला नसल्यानेनाराजी व्यक्त केली आहे. आॅक्टोबर मिहन्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शक्य होईल तेव्हढेच पाणी पिकाला देत असल्याने पिकांची वाढ देखील खुंटली आहे.पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादन देखील मोठीं घट झाली आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे त्यामुळे दुष्काळी यादीतून बेपत्ता झालेल्या येवला तालुका दुष्काळ आहे की नाही हे पाहणी करण्यासाठी मंत्री राम शिंदे येवला तालुक्यात कधी येणार ? यावर शेतकर्यांच्या नजरा लागल्या असून येवला तालुका दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आण िदुष्काळाच्या सर्व उपाययोजना करून शासनाने चारा छावण्या , पालखेड कालव्यातून रब्बीच्या
पिकाला दोन आवर्तन देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: Water by onion crop tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.