शिक्षक-पालकांच्या मदतीने पाणीयोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:14 AM2020-01-15T01:14:51+5:302020-01-15T01:15:18+5:30

सिन्नर तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आली होती. मात्र शिक्षकांची जिद्द आणि पालक यांच्या सहकार्यातून शाळेसाठी परिसरातून विहिरीतून पाणीयोजना राबविण्यात आली.

Water planning with the help of teachers and parents | शिक्षक-पालकांच्या मदतीने पाणीयोजना

सिन्नर तालुक्यातील मेनखिंड प्राथमिक शाळेत अनेक दिवसांनी पाणी योजना सुरू झाल्यानंतर पाणी पिऊन तहान भागविताना विद्यार्थी.

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा गेल्याने समाधान

सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ आली होती. मात्र शिक्षकांची जिद्द आणि पालक यांच्या सहकार्यातून शाळेसाठी परिसरातून विहिरीतून पाणीयोजना राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा हंडा जाऊन शाळेत पाणीयोजनेद्वारे पाणी आले. शालेय पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या दररोजच्या परिस्थितीत मार्ग करण्याचे शिक्षक अविनाश खेडकर आणि नीलम वाळुंज यांनी ठरवले. मुख्याध्यापक रंगनाथ थेटे यांनी शाळेस पाचशे लिटर पाण्याचे टाकी भेट दिली आहे.
सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद शाळेत आजपर्यंत पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे मुलांना आपली तहान भागविण्यासाठी घरूनच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दप्तरात आणत होते. या बाटल्यांमुळे मुलांना अतिरिक्त बोजा पाठीवर सहन करावा लागत होता, तर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांची तहान भागविण्यासाठी विहिरीतून पाणी ओढून द्यायचे आणि मुले डोक्यावरुन पाणी वाहण्याचे काम करीत होते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

Web Title: Water planning with the help of teachers and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.