पाण्याचे नियोजन करण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:42+5:302021-07-10T04:11:42+5:30

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संभाव्य टंचाईविषयीची चिंता व्यक्त करतानाच ...

Water planning instructions | पाण्याचे नियोजन करण्याची सूचना

पाण्याचे नियोजन करण्याची सूचना

Next

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी संभाव्य टंचाईविषयीची चिंता व्यक्त करतानाच पुढील महिन्याची वाट न पाहाता लागलीच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकला ऑगस्टपर्यंत पुरेल इतका धरणात पाणीसाठा असल्याचे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी यापूर्वी सांगितले होते.

यंदा दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी सध्याची परिस्थिती पाहाता वेळीच सावध हेाण्याची आवश्यकता आहे. पाऊस नसल्याने अडचणीची परिस्थिती निर्माण झाली असून, पाणी जपून वापरावेे लागणार आहे. अशीच परिस्थिती राहिली तर धरणातील पाणीसाठा कमी कमी हाेत जाणार असल्याने सर्वांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. आपण वेळीच पाण्याचे नियोजन केले नाही तर लातुरसारखी परिस्थिती उद‌्भवली तरी धावपळ करण्याची वेळ येईल. त्यावेळी लातुरला रेल्वेने पाणी मागविण्याची वेळ आली होती. त्यामुळे टंचाईचा प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या.

जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. धरणातील पाणीसाठादेखील कमी होत असल्याने अगोदर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा लांबली तर बिकट वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होण्याची आवश्यकता असल्याने सांभाळून पाऊले उचलावी लागतील, असे भुजबळ यांनी सांगितले.

---इन्फो--

धरणातील साठा तळाला

जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून, जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांमध्ये अवघा २७ टक्के इतकाच जलसाठा आहे. तर नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात ३५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. मागीलवर्षी या कालावधीत गंगापूर धरणातील साठा ५० टक्के इतका होता. गंगापूर, काश्यपी, गौतमी आणि आळंदी या धरण समूहात तर २५ टक्के इतकाच साठा शिल्लक असून, मागीलवर्षी या कालावधीत २५ टक्के इतके पाणी समूहात होते.

Web Title: Water planning instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.