शिवालय तीर्थात मासे सोडल्याने पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:57+5:302021-05-18T04:14:57+5:30
सप्तशृंगगड : येथील पुरातन गिरजातीर्थ किंवा शिवालय तीर्थात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मांगूर या जातीचे मासे मोठ्या प्रमाणावर ...
सप्तशृंगगड : येथील पुरातन गिरजातीर्थ किंवा शिवालय तीर्थात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मांगूर या जातीचे मासे मोठ्या प्रमाणावर सोडल्याने पाणी दूषित झाले आहे. माशांच्या विष्ठेमुळे पाण्याचा रंगही हिरवागार पडला आहे व पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांच्या निर्णयानुसार मांगूर मत्स्य संवर्धन करणे बंदी आहे. मांगूर हा अति मांसाहारी मासा आहे. हा मासा अनावधानाने नजीकच्या तलावत गेल्यास तेथील स्थानिक मासे व नैसर्गिक जैवविविधतेवर अनिष्ट परिणाम करतो, असा आदेश महाराष्ट्र शासन सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय नाशिक यांचा असूनदेखील ट्रस्टने मासे सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. माशांमुळे अक्षरश भाविकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. असा प्रकार किती दिवस सुरू राहील, असा आरोप भाविकांकडून केला जात आहे. विश्वस्तांनी व तहसीलदारांनी या विषयाकडे लक्ष घालावे व पाऊस पडण्याआधी हे शिवालय तीर्थातील पाण्याचा उपसा करून कायमस्वरूपी मासे काढून स्वच्छ करावे व त्यात टँकरने नवीन पाणी टाकावे, अशी मागणी भाविकांकडून व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-------------
ट्रस्ट मनमानी कारभार करत आहे. भाविक तीर्थ म्हणून हे पाणी प्रसाद म्हणून घेऊन जातात. माशांमुळे पाणी हिरवे व दुर्गंधीयुक्त झाले आहे. भाविकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार ट्रस्ट करत आहे.
नवनाथ बेनके, शिव छावा संघटना, कळवण (१७ गड)
===Photopath===
170521\17nsk_12_17052021_13.jpg
===Caption===
१७ गड