बंधाºयांना फळ्या बसवून अडवणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 11:51 PM2017-08-17T23:51:00+5:302017-08-18T00:10:12+5:30
नाशिक : दिवसेंदिवस पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता, अडविल्या जाणाºया पाण्याचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने व विशेषकरून जलसंपदा विभागाने यंदा सर्वच बंधाºयांचे पाणी वाया न जाऊ देता ते अडविण्यासाठी त्यांना निडल्स (लाकडी फळ्या) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार बंधाºयांचे गेट बंद करण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
नाशिक : दिवसेंदिवस पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता, अडविल्या जाणाºया पाण्याचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने व विशेषकरून जलसंपदा विभागाने यंदा सर्वच बंधाºयांचे पाणी वाया न जाऊ देता ते अडविण्यासाठी त्यांना निडल्स (लाकडी फळ्या) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार बंधाºयांचे गेट बंद करण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. पाणी अडविण्यासाठी सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर योजना व निधी खर्च करीत असले तरी, बहुतांशी बंधाºयांचे पाणी बंधाºयाची गळती वा निडल्सच्या दुरवस्थेमुळे वाहून जाते, परिणामी मूळ हेतुलाच तडा बसत असल्याची बाब वेळोवेळी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाली आहे. पाटबंधारे विभाग, स्थानिक स्तर व जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत या बंधाºयांची उभारणी व देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, मात्र बंधाºयांची दुरुस्ती असो वा निडल्स बसविणे त्यासाठी आर्थिक तरतूद केली जात नसल्याने पावसाळा संपल्यानंतर बंधाºयातील पाणी वाहून जाते. यंदा पावसाळा बेभरोशाचा झाल्याने जे काही पाणी बंधाºयांमध्ये साचले आहे, त्या पाण्याची साठवणूक व योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सर्वच लहान-मोठ्या बंधाºयांची पाहणी करून त्यांना निडल्स बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात बैठक घेऊन तशा सूचना दिल्या आहेत.नाशिक जिल्ह्णातील गिरणा व गोदावरी नदीवर नऊ मोठे बंधारे असून, स्थानिक स्तर व जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कोल्हापूर टाइप बंधाºयांची दुरुस्ती केली जाणार आहे. पाटबंधारे खात्याने नािशक व नगर जिल्ह्णांसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील नऊ बंधाºयांसाठी ४० लाख व उर्वरित रक्कम नगर जिल्ह्णातील ५४ बंधाºयांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३२ लाख आणि गिरणा विभागाच्या माध्यमातून १२ लाखांच्या निधीची तरतूदही स्थानिक पातळीवर करण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या ताब्यातील बंधाºयांची दुरुस्ती जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी दिली. बंधाºयांना निडल्स बसविल्याने शंभर टक्केपाणी अडविले जाणार आहे.