पाणीप्रश्न बिकट
By admin | Published: March 3, 2016 10:25 PM2016-03-03T22:25:11+5:302016-03-03T22:36:36+5:30
पाणीप्रश्न बिकट
Next
नांदगाव : पाण्यासाठी लागतात रेशन दुकानांसारख्या रांगासंजीव धामणे ल्ल नांदगाव
पृष्ठभागावरचे पाणी दिवाळीतच आटले. आता पाण्याने विहिरींचा तळ गाठला असून, गावोगावी पाणी हापसणारी तरुणाई व रणरणत्या उन्हात कंबरेवर व डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या महिला हे नांदगावच्या ग्रामीण भागातले चित्र आहे. नांदगाव व मनमाड शहरात १५ ते २० दिवसांनी पाणी येते. अशी पाणीटंचाईची स्थिती आहे. पूर्वी रेशन दुकानांमध्ये धान्यासाठी लागणाऱ्या रांगांप्रमाणे ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी पाण्यासाठी रांगा लागत आहेत.