सिन्नरच्या पूर्व भागात पाणीप्रश्न बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:16 AM2019-06-05T00:16:02+5:302019-06-05T00:16:22+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी, देवपूर, पंचाळे, मिठसागरे, शिंदेवाडी, शहा या गावांमध्ये वस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत असली तरी प्रत्यक्षात मात्र लोकसंख्या आणि टॅँकरमार्फत वाटप होणारे पाणी यांचा ताळमेळ लागत असल्याने अपुºया पाण्यावर जनावरांसह माणसांची तहान भागवावी लागत आहे. पंचाळे येथे दहा हजार लिटर क्षमतेच्या शासकीय टॅँकरच्या पाच फेºया होतात, तर निमा उद्योग संघटनेकडून जनावरांसाठी देवपूर, पंचाळे, मिठसागरे या गावांसाठी प्रत्येकी २२ हजार लिटर क्षमतेच्या टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलसेवेचा पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचाळे गावामध्ये पिण्याची पाण्याची टंचाई नसून ग्रामस्थांना वडांगळीच्या अकरा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. परंतु गावापेक्षा ही वस्ती वाड्यांवर लोकसंख्या जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची झळ वस्तीवाड्यांवरील रहिवाशांना बसत आहे. शासनाच्या वतीने वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही गावात टाक्या बसवण्यात आल्या नाही. रहिवाशांना खर्च करून टाक्या खरेदी करून त्यात पाण्याचा साठा करावा लागत आहे. गावात तीन हजार लोकसंख्या असून, त्याप्रमाणात दोन वाढीव टॅँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव २० हजार पाणी उपलब्ध होऊ शकते. विदारक स्थिती ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसाठी रोजगार हमी योजना उदरनिर्वाहासाठी हक्काची योजना होती. अनेकदा दुष्काळात रोजगार हमीचे जगण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाची परिस्थिती भयानक आहे.