बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:38 PM2018-06-27T22:38:45+5:302018-06-27T22:39:56+5:30

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

Water purification campaign in Baglan taluka | बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

बागलाण तालुक्यात जलशुद्धिकरण मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देनिर्जंतुकीकरण : प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र येथे पाणी साठविण्याच्या टाक्या, ड्रम, फिल्टर यांची स्वच्छता

सटाणा : ग्रामपंचायत ,अंगणवाडी व शाळांमधील पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ ,टाक्या व हातपंप शुद्धीकरण अभियानास बागलाण तालुक्यात प्रारंभ करण्यात आला आहे.पिहल्या टप्प्यात ८१ गावांच्या टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांनी येत्या 18 जून ते 6 जुलै पर्यंत पत्येक गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार बागलाण तालुक्यात शुद्धीकरण अभियान राबविण्यात येत आहे.तालुक्यातील ताहाराबाद ,द्याने ,सोमपूर ,जायखेडा ,आसखेडा ,ब्राम्हणपाडे ,मुंजवाड ,चौंधाणे, करंजाड ,निताणे, केरसाणे, दसाणे, पिंगळवाडे, पारनेर .आराई ,बुंधाटे, पठावे दिगर, मुंगसे, सारदे,जोरण ,डांगसौदाणे, कंधाणे, दिहंदुले ,निकवेल, तळवाडे दिगर, तरसाळी ,औंदाणे, जाखोड, मोरकुरे आदी गावांमध्ये स्वच्छता व जलस्रोत यांचे शुद्धीकरण अभियान राबविण्यात आले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्या.तसेच प्राथमिक शाळा ,अंगणवाडी केंद्र येथे पिण्याचे पाणी साठविण्याच्या टाक्या ,ड्रम ,फिल्टर यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.गावातील पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण ,हातपंप ,पाण्याचे जलकुंभ व टंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.ज्या स्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते .त्यांचे व हातपंपचेही शुद्धीकरण होत आहे.त्यासाठी सरपंच ,सदस्य पुढाकार घेत असून त्यांना आरोग्य विषयी माहिती आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून दिली जात आहे.स्वच्छता विभागाचे वैभव पाटील ,उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार ,ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,अंगणवाडी सेविका ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 
जलकुंभांसह हातपंपाचे होणार शुद्धीकरण
कळवण येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या सुचनेनुसार दोन दिवस तालुक्यातील ८६ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व गाव, वाड्या व वस्तीवर तसेच अंगणवाडी, तालुक्यातील २०७ प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान राबविले जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम यांनी दिली.
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मिळण्यासाठी व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी डॉ. गिते यांनी असे नावीन्यपूर्ण अभियान जिल्ह्यात सुरू केले आहे. यामुळे गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी पावसाळ्यात नियमति शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याबाबत सर्व तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला निर्देश दिले असून, पावसाळ्यात एकाही गावात पिण्याच्या पाण्यामुळे साथ उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार सर्व ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडीतील पाण्याचे जलकुंभ व हातपंप शुद्धीकरण दोन दिवसात करण्यात येणार आहे, देखरेख साठी तालुकास्तरावरून संपर्कअधिकारी नेमण्यात आले आहे.
- डी.एम.बहिरम, गटविकास अधिकारी

Web Title: Water purification campaign in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.