धनगरवाडी शाळेत जलशुद्धिकरण यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 05:55 PM2019-03-28T17:55:51+5:302019-03-28T17:56:18+5:30
सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
सिन्नर : तालुक्यातील धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
तालुक्यातील धनगरवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. त्यात ५५ विद्यार्थी असून, शाळा दोन शिक्षकी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात या शाळेस ग्रामस्थांकडून बक्षीस रुपये दहा हजार पाचशे रुपये जमा झाले होते. गावातील देणगीदार व व्यावसायिक यांनी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत देणगी दिली. या जमा झालेल्या एकत्रित रकमेतून शाळेसाठी जलशुद्धिकरण यंत्र बसविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध होऊन आरोग्याच्या तक्र ारी कमी झाल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश उगले यांनी दिली.
विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थितीचे प्रमाणही वाढले आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण शिंदे, महेश डुंबरे, मुख्याध्यापक सुरेश उगले, उपशिक्षक नीलेश बिडगर यांच्या उपस्थितीत जलशुद्धिकरण यंत्राच्या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. फिल्टरमधून उपलब्ध थंड पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी घ्यावे लागते. यामुळे वॉटर फिल्टरमधून जारमध्ये साठलेल्या पाण्याचा विद्यार्थ्यांना पिण्यासाठी उपयोग होत आहे. ग्रामस्थांच्या मदतीने ही सुविधा उपलब्ध झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.