कसमादेवासीयांचा पाणीप्रश्न मिटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:32 PM2020-04-16T20:32:42+5:302020-04-17T00:28:39+5:30

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.

 Water question of Kasamadwisis erased! | कसमादेवासीयांचा पाणीप्रश्न मिटला !

कसमादेवासीयांचा पाणीप्रश्न मिटला !

Next

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून व त्या अंतर्गत कालव्याद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिल्यामुळे पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील गिरणा व पुनंद काठाला दिलासा मिळाला आहे.
चणकापूर व पुनंद धरणात शिल्लक असलेल्या साठ्यापैकी ७५० दशलक्ष घनफूट पाणी बुधवारपासून २०० ते १२०० क्युसेसने गिरणा व पुनंद नदीसोबत चणकापूर उजवा कालव्यात विसर्ग करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सहायक अभियंता वैशाली ठाकरे व पुनंदचे उपअभियंता विजय टिळे यांनी दिली.
चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा व पुनंद नदीपत्रात व त्या अंतर्गत कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेकडून होत असल्यामुळे आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी साठा असल्याचे निदर्शनास आणून देत पाणी सोडण्याची मागणी केली होती.
कसमादे पट्ट्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातील व गिरणा व पुनंद नदीकाठावरील गावे व मालेगाव महानगरपालिका, सटाणा नगर परिषद, कळवण नगरपंचायत व इतर पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याने पाणी सोडण्यात आले आहे.  चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा आणि पुनंद नदीला, चणकापूर उजवा कालव्याला एकाच वेळी सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चणकापूरच्या पाण्याने मालेगावसाठी असलेल्या तळवाडे तलाव भरण्याचा खास उद्देश असून, या अंतर्गत कसमादेसह इतर गावांनाही फायदा होणार आहे. दोन्ही धरणात असलेला शिल्लक पाणीसाठा आगामी काळात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास वापरण्यात येणार असून, या नियोजनामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title:  Water question of Kasamadwisis erased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक