पेठ तालुक्यातील अतिदुर्गम खोकरीपाड्यात पोहोचले पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 12:14 AM2022-06-26T00:14:59+5:302022-06-26T00:15:27+5:30
पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
आदिवासी भागातील खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी एसएनएफ आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, ग्रामपंचायत गावंध व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही पाणीपुरवठा योजना आकाराला आली आहे. गावाच्या वेशीवरून वाजत गाजत जल मिरवणूक काढून जलकुंभाचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर पोपट भुसारे यांनी आभार मानले.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी, सचिव नंदकिशोर लाहोटी, सेवाकार्य अध्यक्ष अजय सानप, लायन अनंत पाटील, लायन मनीष जाधव, लायन कैलास पवार, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे, बारकू रिजड, पोपट भुसारे, नामदेव खोटरे, ग्रामसेवक पखाने, छबुनाथ चौधरी, प्रशांत गर्जे, पुंडलिक टोकरे, नामदेव भांगरे, लक्ष्मण रिंजड, वसंत पाडवी, पंढरीनाथ दरोडे, जिजाबाई कुंभारे, येणूबाई रिजड, विजय भांगरे, विनोद खोटरे, संदीप डगळे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते.