येवल्यातील साठवण तलावात पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:42+5:302021-06-26T04:11:42+5:30

येवला : येवला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावात पालखेड कालव्यातून आवर्तनाद्वारे पाणी पोहोचल्याने शहरातील पाणीटंचाई दूर होणार आहे. साठवण ...

Water reaches the storage pond at Yeola | येवल्यातील साठवण तलावात पोहोचले पाणी

येवल्यातील साठवण तलावात पोहोचले पाणी

Next

येवला : येवला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावात पालखेड कालव्यातून आवर्तनाद्वारे पाणी पोहोचल्याने शहरातील पाणीटंचाई दूर होणार आहे. साठवण तलावावर उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांचे हस्ते जलपूजन करण्यात आले.

शहराला पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर आठवड्यातून एक वेळ पाणीपुरवठा सुरू होता. तर शहरात गढूळ, दूषित पाणीपुरवठ्यासह काही भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर उनगराध्यक्ष पटणी यांचे नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रवीण बनकर, शिवसेना गटनेते दयानंद जावळे, अपक्ष गटनेते रूपेश लोणारी, भाजपचे गणेश शिंदे यांनी एकत्रितपणे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांची भेट घेऊन शहराच्या पाणीप्रश्‍नांसंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती. परिणामी, पालखेडचे आवर्तन पालिकेला आठ दिवस अगोदर मिळाले.

पालखेड कालव्यातून मिळणारे आवर्तनाचे पाणी लवकरात लवकर पालिकेच्या साठवण तलावात घेण्यासाठी कालव्याचे ठिकाणी मोठे गेट बसविण्याबाबत याप्रसंगी उपस्थित असलेल्या पालखेड पाठबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर उपनगराध्यक्ष पटणी व सहकारी नगरसेवकांनी चर्चा केली. अधिकारीवर्गाने यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. जलपूजन प्रसंगी प्रवीण बनकर, पाणीपुरवठा सभापती दयानंद जावळे, रूपेश लोणारी, गणेश शिंदे, गणेश गायकवाड, निसारभाई लिंबूवाले, शफिकभाई शेख, मलिक शेख, सलीम मुकादम, डॉ.संकेत शिंदे, मुश्ताक शेख, आमजद शेख, संतोष परदेशी, ज्ञानेश्वर वाखारे, सचिन मोरे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदींसह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

कोट....

शहरातील समस्यांकडे नगराध्यक्षांचे दुर्लक्ष होत असल्याने, शहरात पालिका कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यापुढे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष दिले जाणार असून, विकासकामेही गतीने पूर्ण करणार आहोत.

- सूरज पटणी, उपनगराध्यक्ष

फोटो - २५ येवला वॉटर

येवला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावात पालखेडचे पाणी पोहोचले. या प्रसंगी जलपूजन करताना उपनगराध्यक्ष सूरज पटणी. समवेत नगरसेवक शफीक शेख, डॉ.संकेत शिंदे, अमजद शेख आदी.

===Photopath===

250621\25nsk_14_25062021_13.jpg

===Caption===

फोटो - २५ येवला वॉटर  येवला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या साठवण तलावात पालखेडचे पाणी पोहचले. या प्रसंगी जलपूजन करतांना उपनगराध्यक्ष सूरज पटणी. समवेत नगरसेवक शफीक शेख, डॉ. संकेत शिंदे, अमजद शेख आदी. 

Web Title: Water reaches the storage pond at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.