जलसंपत्ती जपणे काळाची गरज जलउत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणीबचतीचे प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:51 AM2018-05-27T00:51:58+5:302018-05-27T00:51:58+5:30

नाशिक : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा हक्काने वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणीबचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

WATER REQUIREMENTS WATER REQUESTED | जलसंपत्ती जपणे काळाची गरज जलउत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणीबचतीचे प्रतिज्ञा

जलसंपत्ती जपणे काळाची गरज जलउत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणीबचतीचे प्रतिज्ञा

Next
ठळक मुद्दे पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांना ते उपलब्ध होऊ शकेलजलबचतीचा संदेश देण्याचा विश्वविक्रम

नाशिक : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा हक्काने वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणीबचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा राहील. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांना ते उपलब्ध होऊ शकेल, असा विचार लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जलउत्सव’ या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी मांडला.
सिडको परिसरातील उत्तमनगर येथील भोळे मंगल कार्यालयात शनिवारी (दि.२६) लोकमत मंच आणि अन्य महिलांसाठी जलउत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संचलित आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या गीतांजली आव्हाड, जलबचतीचा संदेश देण्याचा विश्वविक्रम करणारी सृष्टी नेरकर, डॉ. उमेश मराठे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, तसेच निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य बस्ते यांनी सांगितले की, एकीकडे शहरात पाण्याचा अमर्याद वापर होत असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मात्र महिलांना कळशीभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. आपण सर्वांनी त्यामुळे जलसंपत्तीकडे जबाबदारी आणि कर्तव्य भावनेने बघितले पाहिजे. गीतांजली आव्हाड म्हणाल्या की, जल है तो कल है, ही बाब लक्षात घेता महिलांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या मजले चिंचोली या गावात चार-पाच वर्षांपूर्वी पाणीटंचाई ही मोठी समस्या होती, परंतु जलयुक्त शिवार योजना, जलस्त्रोताचे नियोजन, पाणी फाउंडेशन आदींसह शासनाच्या विविध योजनांच्या सहाय्याने लोकसहभागातून गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जलबचतीसाठी विविध ठिकाणी प्रबोधन करणाऱ्या सृष्टी नेरकर हिनेदेखील दृकश्राव्य माध्यमातून पाणीबचतीचे महत्त्व महिलांंसह उपस्थिताना पटवून दिले.
यावेळी किरण अग्रवाल यांनीही जलबचतीचे महत्त्व सांगितले. बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविकात रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जलउत्सव’ या कार्यक्रमाची माहिती दिली.

Web Title: WATER REQUIREMENTS WATER REQUESTED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी