नांदूरशिंगोटे परिसरात जलसाठे कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:46+5:302021-08-20T04:18:46+5:30
कासारवाडी ग्रामपंचायतीला कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य नांदूरशिंगोटे : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी ग्रामपंचायतीला क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड कंपनीकडून कोरोना ...
कासारवाडी ग्रामपंचायतीला कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी ग्रामपंचायतीला क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेड कंपनीकडून कोरोना प्रतिबंधात्मक किट देण्यात आले. कंपनीचे केंद्र व्यवस्थापक दीपक पवार यांनी सॅनिटायझर, मास्क यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सुनील सांगळे, उपसरपंच सचिन देशमुख, सदस्य विशाल साळुंखे, राजेंद्र शेळके, उल्हास शेळके, वसंत देशमुख, ग्रामसेवक कविता आंब्रे आदी उपस्थित होते.
कृषीदूतांकडून शेतकऱ्यांना माहिती
नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विद्यालयातील कृषीदूत आकाश देशमुख यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. या अंतर्गत शेतकऱ्यांना मातीपरीक्षण, पीकपद्धती, पीकनियोजन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बळीराजाला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेची माहिती दिली. डॉ. अतुल दरंदले, पी.जी. पाटील यांचे आकाश यांना मार्गदर्शन लाभले.
हमरस्त्यावर मोकाट जनावरांची वर्दळ
नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान व डुकरांचा उपद्रव वाढला आहे. तसेच मोकाट जनावरांची हमरस्त्यावरील वर्दळ मात्र कमी झालेली नाही. ही जनावरे रस्त्याच्या मध्येच आपली बैठक मारतात, तर कधी सुसाट धावतात, त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानकात स्वच्छता मोहीम आवश्यक
नांदूरशिंगोटे : येथील बसस्थानकात गत काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बसस्थानकाच्या आजूबाजूला गाजरगवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यामुळे विविध आजार निर्माण होऊ शकतात. कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. गोळा करून ठेवलेला कचरा वाऱ्याने अस्ताव्यस्त उडत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानकप्रमुखांनी याची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.