धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:35 AM2018-01-09T00:35:28+5:302018-01-09T00:38:10+5:30

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून, ३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

Water reservoir in abundance; Still the water-saving challenge | धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

Next
ठळक मुद्देमहापालिका : प्रतिदिन १५ दलघफू पाणी उपसा३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक१२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून, ३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिकेला १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणातील ३९०० तर दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित केले आहे. प्रतिदिन १४.८२ दलघफू पाणी उपशाप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. महापालिकेने दि. १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गंगापूर धरणातून १२१०.४५ दलघफू तर दारणा धरणातून ८१.२२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. दोन्हीमिळून १२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. महापालिकेने आतापर्यंत प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याची उचल करत शहराला उन्हाळ्यात वाढणार पाणीवापर सद्यस्थितीत हिवाळ्यामुळे पाण्याची मागणी कमी आहे. तरीही महापालिकेकडून गंगापूर धरणातून १५.२० दलघफू पाण्याची उचल होत आहे. आता फेबु्रवारीपासून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार असून महापालिकेला त्यादृष्टीने नियोजन करणे भाग पडणार असून, नागरिकांचेही प्रबोधन करावे लागणार आहे.

Web Title: Water reservoir in abundance; Still the water-saving challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण