मोरवड येथे जलमित्र, ग्रामस्थांनी केला संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:34 AM2018-04-02T00:34:34+5:302018-04-02T00:34:34+5:30
तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोरवड येथील पाच जणांनी पाणी फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण घेतले. या जलमित्रांनी गाव पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे करण्याचा निर्धार केला. रामकिसन हाळसे, आप्पाराव दुधाळकर, बाळू बेले, लक्ष्मण गलांडे, लीलाबाई हराळ, सरपंच मीरा बेले यांचा जि.प.सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावाला कोणत्याही परिस्थितीत वॉटरकप स्पर्धेत बक्षीस मिळविण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.
चालकांना दंड
हिंंगोली - अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरूद्ध पोलिसांनी ३१ मार्च रोजी कारवाई केली. ५४ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई करून १२ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला.