जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा सिन्नर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 09:07 AM2018-10-26T09:07:50+5:302018-10-26T09:09:35+5:30
राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सकाळी 7.30 वाजेपासून सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यास सुरुवात केली.
Next
सिन्नर (नाशिक) - राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सकाळी 7.30 वाजेपासून सिन्नर तालुक्यात दुष्काळ पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. वावीपासून पाहणी दौरा सुरू झाला. वावी येथील सापते व ताजणे नामक शेतकऱ्यांची कपासी व बाजरी शेताची पाहणी केली. लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आमदार राजाभाऊ वाजे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, वावीचे उपसरपंच विजय काटे, बाबासाहेब कांदळकर, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यासह कृषी, वन व अन्य खात्याचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.