पर्वणी काळात पाणी नमुना तपासणीचा ठेकाही संशयास्पद
By Admin | Published: August 19, 2016 01:02 AM2016-08-19T01:02:11+5:302016-08-19T01:02:56+5:30
महापालिका : शासकीय ऐवजी खासगी संस्थेला काम
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी गोदावरी नदीपात्रातील पाणी नमुना तपासणीसंदर्भात शासकीय ऐवजी खासगी संस्थेला दिलेला ठेकाही संशयाच्या घेऱ्यात सापडला असून, स्थायी समितीवर त्याबाबत प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
आयुक्तांच्या निर्देशानुसार मे. अश्वमेध इंजिनिअर्स व कन्सल्टंट्स सीएसएल या खासगी संस्थेमार्फत पर्वणी काळात सकाळ व संध्याकाळ पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सदर संस्थेने याबाबतचा अहवालही मनपाला सादर केला. सदर संस्थेकडून रामकुंडाखालील बाजू, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर घाट, नासर्डी संगम घाट, लक्ष्मी नारायण घाट, नांदूरदसक घाट आदि ठिकाणी पाणी नमुने तपासण्यात आले. तसेच पेस्टीसाईडचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, सदर संस्थेने केलेल्या कामाचा मोबदला १२ लाख ३२ हजार रुपये अदा करण्यासंबंधीचा प्रस्ताव मलनिस्सारण विभागाकडून स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला.