राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:07 PM2020-02-24T23:07:05+5:302020-02-25T00:26:25+5:30

येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.

Water saving is a priority at Rajapur | राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

Next
ठळक मुद्देउन्हाची दाहकता : टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांकडून काटकसर

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.
राजापूर परिसरात यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले असले तरी येथे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागतात. राजापूर वाडी-वस्त्यांवरील नागरिक विहिरीमध्ये पाणी शिल्लक ठेवून उन्हाळात पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी पुरेल म्हणून आत्तापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे. अजून पाच सहा महिने पाणी पुरेल या हेतूने पाणीबचत शेतकरीवर्ग करीत आहे.
राजापूर व परिसरात उन्हाळ कांदा लागवड ही फक्त शेततळे असलेल्या शेतकºयांची आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्यासाठी दररोज २०० ते ३०० लिटर पाणी एका कुटुंबाला लागते. त्यामुळे शेतकरीवर्ग आत्तापासूनच पाणी वाया न घालवता विहिरीत ते साठवून पुढील काही महिने पाणी पुरेल या हेतूने बचत करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पुढील काही दिवसात पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवत आहे. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळाच्या झळा कायमच आहे. तालुक्याची पूर्व भागाची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयानक होत आहे. साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चार-पाच महिने काढावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पाणी वापर काटकसरीने करीत आहे. पाणी संकट उभे राहिल्याने महिला वर्ग पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे.

Web Title: Water saving is a priority at Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.