पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: March 11, 2017 01:11 AM2017-03-11T01:11:42+5:302017-03-11T01:11:55+5:30
त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत.
त्र्यंबकेश्वर : येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावालगतच धरण असून, त्याचे पाणी शेतीसाठी आरक्षित असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापर करू शकत नाहीत. गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरी तीव्र उन्हामुळे आटून गेल्या आहेत. अशा परिस्थितीत वाघेरावासीयांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यातील काही गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. वाघेरा धरण गेल्या वर्षी ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे ६३ मि.मी., १२८ मि.मी. व २३० मि.मी. पाऊस पडून अतिवृष्टी झाली होती. या तीन दिवसात तालुक्यातील नद्या-जलाशय पूर्ण भरले होते. वाघेरा धरणही पूर्ण भरले होते. पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मते धरण बांधून बराच कालावधी उलटल्याने धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. पाण्याचा दाबाने धरणाचे दरवाजेच बंद होत नव्हेत. त्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. पण दरवाजे बंद होईनात. शेवटी पाणबुड्यांच्या मदतीने नवीन दरवाजे बसविले; पण तोपर्यंत धरणातील ६० ते ७० टक्के पाण्याचा विसर्ग झाला. (वार्ताहर)