त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:30 PM2020-04-25T23:30:16+5:302020-04-25T23:30:40+5:30

कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.

Water scarcity crisis in Trimbakeshwar taluka is dark | त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर पाणीटंचाई तीव्र झाल्याने हंडाभर पाण्यासाठी भटकंती करताना महिला.

Next
ठळक मुद्देपाणीयोजना अपूर्णावस्थेत । टॅँकरसाठी दोन प्रस्ताव दाखल

त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीच्या संकटासोबतच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. लॉकडाउनमुळे आधीच हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागताना दिसून येत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापुर्वीच बरड्याच्या वाडीच्या रूपाने पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. सध्या या वाडीचा पाणीटंचाईचा पूर्ण तूर्तास सुटला असताना आता तालुक्यातील वेळे आणि विनायक नगरमध्ये टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमध्ये येऊन धडकले आहेत. मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असे वाटत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एकूण दहा कामे मंजूर झाली असून, त्यापैकी चार कामांच्याच निविदा निघाल्या होत्या, पण ठेकेदारांचा हलगर्जीपणा व यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सुरू असलेली कामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. या कामांपैकी रायते व मुलवड येथील कामाची मुदत १ नोव्हेंबर २०१९ रोजी व मुलवड येथील कामाची मुदत १ जानेवारी २०२० रोजी संपली असूनही काम नेहमीप्रमाणे काम प्रगतीत असल्याचे सांगितले जात आहे. खैराईपाली व अंजनेरी येथील कामाची मुदत ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत आहे. सहा मंजूर कामे कोरोनाच्या व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सध्या शासनानेच थांबविलेली आहेत. नव्याने आता एकही काम प्रस्तावित नाही. मंजुरीच्या प्रतीक्षेतील कामे पूर्ण झाली तरच तालुका टंचाईमुक्त होणार आहे.
सोमनाथनगर, मेटघर किल्ला, बरड्याच्या वाडीचा प्रस्ताव तर अगोदरच दाखल झाला होता. सध्या ३० एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात पाणी- पुरवठा सुरळीत चालू असला तरी मे महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठ्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविक अंबोली धरण आटल्यावर अंबोली धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. पण नगर परिषदेचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

Web Title: Water scarcity crisis in Trimbakeshwar taluka is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.