गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 07:20 PM2019-06-05T19:20:45+5:302019-06-05T19:24:18+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे.
गणेशगाव वाघेरा येथील नागरिकांनी परिसरातील पाण्याच्या टंचाहीची दाहकता प्रशासनास कळावी याकरिता मागील वर्षापूर्वी गणेशगाव पैकी विनायक नगर येथील नागरिकांनी टंचाई व पाण्याची दाहकता या विषयावर शॉर्ट फिल्म बनवली होती व तत्कालीन राष्ट्रपती व जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली होती, परंतु यावर पुढे काहीही झाले नसल्याची नाराजी यावेळी गावकऱ्यांनी बोलून दाखवली.
आमच्या गावात इतका दुष्काळ पडला की, अक्षरश: डोळ्यातून पाणी आणले. या दुष्काळाने माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विहिरी कोरड्या पडल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावाने श्रमदान करून विहिरीतील गाळ काढला, तरीही शुद्ध पाणी बघायला सुध्दा भेटत नाही. या दुष्काळाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
- श्रीमती रुक्मिणी उदार
सरपंच, गणेशगाव (वा).
त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विचार केला असता तालुक्यात असे एकही धरण नाही. तालुक्याची तहान भागेल असे धरण उभारणी केली पाहिजे. गणेशगावचा प्रश्न तर फार गंभीर आहे. पाण्यासाठी एक चित्रफीत तयार केली व तत्कालीन राष्ट्रपती यांना पाठवण्यात आली,परंतु या गंभीर प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
- शरद महाले
ग्रा. प. सदस्य, गणेशगाव (वा).
दुष्काळाचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने जलसंधारण, मृदूसंधारण व रोजगार हमीचे कामे चांगल्या प्रतीचे होणे गरजेचे आहे. नदी-नाले, वळण बंधारे यावरील वैयक्तीक उपसा व अतिक्र मण हटवला पाहिजे. वैयक्तीक विहिरींचे देखभाल व पूर्व व पश्चिम वाहिन्या वाढवणे गरजचे आहे. तेव्हा गणेशगाव व तालुक्याचा पाणी प्रश्न मिटवु शकतो.
- देवचंद महाले
पोलीस पाटील गणेशगाव (वा).
(फोटो ०५ वेळुंजे, ०५ वेळुंजे १)