येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे ५ गावांची टँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 03:02 PM2022-03-30T15:02:46+5:302022-03-30T15:05:01+5:30

मार्चमध्येच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. 

Water scarcity in the north-eastern part of Yeola; Demand for 5 village tankers from Panchayat Samiti | येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे ५ गावांची टँकरची मागणी

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे ५ गावांची टँकरची मागणी

Next

नाशिक- येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला. अक्षरशः पिके पाण्यात पडली, असे असूनही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, उत्तर-पूर्व भागात अनेक गावांत टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. मार्चमध्येच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. 

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील येवला तालुक्यातील उत्तर - पूर्व भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत असते.अक्षरशः तालुक्यातील ममदापूर भागातील महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील म्हणून भटकंती करण्याची वेळ या महिलांवर येत असल्याने त्वरित गावाला पाण्याचा टॅंकर चालू करावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहे.उत्तर पूर्व तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून विहिरींनी तळ गाठला असल्याने अक्षरशा महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे.

पिण्याच्या पाण्याकरता गावात हातपंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली असून पाण्याचे टॅंकर चालू झाले तर महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागण्याची वेळ येणार नाहीय. तालुक्यातील पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याचा टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून पहिला ममदापूर गावाचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरी करता पाठवला असून बाकीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवले असून मंजूर होऊन आल्यानंतर लगेच या गावांना पाण्याचे टँकर चालू करण्यात येईल. 

Web Title: Water scarcity in the north-eastern part of Yeola; Demand for 5 village tankers from Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.