पंचवटी भागात भर पावसात पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:59 AM2019-07-09T00:59:24+5:302019-07-09T00:59:41+5:30

गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

 Water scarcity in rainy season in Panchavati! | पंचवटी भागात भर पावसात पाणीटंचाई !

पंचवटी भागात भर पावसात पाणीटंचाई !

Next

पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाच्या वतीने दैनंदिन पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येऊन नाशिक शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये असलेल्या शनिचौक, सरदारचौक, गोरेराम लेन, मुठे गल्ली भागात गेल्या चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे परिसरात पाणी येत नसल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाणीकपात केल्याने कमी दाबाने पाणी येत आहे तसेच ज्या भागात पाणी येत नाही त्या ठिकाणी पाण्याला गळती लागली असून, लिकेज सापडत नसल्याचे सांगून वेळ मारून दिली. त्यामुळे नागरिकांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. पंचवटीतील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाºया भागात पहिल्यांदा चार दिवस पाणीपुरवठा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे प्रभागातील या पाणीटंचाईबाबत संबंधित लोकप्रतिनिधीदेखील अनभिज्ञ असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगितले.
शिंगाडा तलाव परिसरात टंचाई
शिंगाडा तलाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अत्यल्प पाणीपुरवठा होत असून, सोमवारी तर संपूर्ण दिवसभर अनेक भागांत पाणी नव्हते. महापालिकेने याबाबत कोणतीही सूचना दिली तर नव्हतीच. शिवाय पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शहरात धो-धो पाऊस पडत असताना गेल्या दोन दिवसांपासून शनि चौक, सरदार चौक, सुकेणकर लेन, मुठे गल्ली या भागात एक थेंब पाण्याचादेखील पुरवठा झालेला नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने गोदाकाठी वसलेल्या पंचवटी भागात प्रथमच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला आहे.
- देवांग जानी, रहिवासी

Web Title:  Water scarcity in rainy season in Panchavati!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.