पाणीटंचाई पाचवीला पुजलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 03:02 PM2020-06-24T15:02:23+5:302020-06-24T15:03:24+5:30
लासलगांव : धरण उशाशी कोरड घशाशी अशी अवस्था सध्या लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या दूर्लक्ष्यामुळे आणि सतत होणाºया वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसापासून पावसाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

पालकमंत्री भुजबळ यांच्या मतदार संघातील लासलगाव या मोठ्या गावी वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ही लासलगाव सह सोळा पाणी योजना झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाचे वरीष्ठ अधिकारी आता या योजनेशी आपल काहीच संबंध नाही अशा अविर्भावात वागत आहेत.
लासलगावला पाणीपुरवठा करणार्या नांदूर-मध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्सप्रेस फिडर बसवले असून तरीदेखील दिवसातून अनेक वेळा सदर लाईन ट्रीप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
या योजनेला एक्सप्रेस फिडर बसवले असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे कोणतीही कारण नसते पण वीज वितरण अधिकारी वारंवार वीज पुरवठा खंडित करतात त्यामुळे संपूर्ण योजनेचे पाणी पुरवठा विस्कळीत होतो.
यासंदर्भात निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे विचारणा केली असता त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांची यासंदर्भात त्वरित बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.
सध्या पाण्याचा मुबलक वापर मोठ्या प्रमाणात होत असताना वीज वितरण कंपनीच्या कृपेमुळे लासलगावकरांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.