बागलाणच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 08:02 PM2019-01-19T20:02:36+5:302019-01-19T20:04:28+5:30

खमताणे : बागलाण तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. विहीरी कोरड्या ठाक असुन, शेतीतील कूपनलिकामध्ये पाण्याचा थेंब ही शिल्लक नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

Water scarcity in rural areas of Baglan | बागलाणच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई

 पश्चिम पट्यात पाण्यासाठी बैलगाडीवर कसरत करून पाणी आणताना शेतकरी.

Next
ठळक मुद्दे२२ गावातील पाडे, वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु

खमताणे : बागलाण तालुक्यात कमी पाऊस झाल्याने यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता नागरिकांना भेडसावू लागली आहे. यंदा ना पाऊस, ना धान्य; अशी स्थिती निर्माण झाली आहे. विहीरी कोरड्या ठाक असुन, शेतीतील कूपनलिकामध्ये पाण्याचा थेंब ही शिल्लक नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
यंदाचा दुष्काळ हा १९७२ पेक्षा भयावह असेल असे जुन्या जाणकारांकडून बोलले जात आहे. ग्रामीण भागात सर्वप्रथम आज पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या अनेक भागात निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये शासनाने टँकर पाणीपुरवठा केला असून, बºयाच ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात दिले आहे. परिसरातील बहुतांशी जलस्रोत आटले असुन, बरेच तलाव कोरडेठाक आहेत. शासनाने कोट्यवधी रु पये खर्च करून राबविले जलयुक्त शिवार यंदा कमी पावसामुळे शिवाराच्या शिवार ओस पडले आहे. अनेक शेतकºयांनी शेतीपिकात जनावरे सोडून दिल्याचे दिसते. त्यामुळे येणाºया काळात जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे.
तालुक्यात अनेक गावांमध्ये गावाला पाणीपुरवठा करणारी नळयोजना पाण्याअभावी बंद पडल्या असुन, तालुक्यातील खिरमाणी, चौगाव, इजमाणे, श्रीपुरवडे, भाक्षी, रामतीर, नवेगाव, पिंपळदर, आनंदपुर, टेंभे वरचे चिराई, राहुड, नळकस व आखतवाडे ही गावे ही लोणारवाडी व वघाणेपाडा अशा दोन वाड्यांना शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा होत असुन, तसेच खमताणे, तळवाडे, भामेर, जुनीशेमळी, भाक्षी, पारनेर, ढोलबारे, आव्हाटी, वनोली या आठ गावांनी शासनाच्या टॅकरसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविले आहे.

ज्या गावांमधून पाण्याबाबत प्रस्ताव पाप्त होत आहे, त्याबाबत तालुक्यास्तरही समितीद्वारे सर्वेक्षण करून गरजेनुसार विहिर अधिग्रहण अथवा टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी पुरवठयÞाचे नियोजन करावे व नागरिकांनी पाण्याचा वापर जपुन करावा.
- प्रमोद हिले, तहसीलदार, बागलाण.
येणाºया काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांसाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे. आमच्या अनेक शेतकºयांची पाणी व चाºयाअभावी जनावरे बाजारात कवडीमोल भावात विकले जातात.
-हितेंद्र बागुल, शेतकरी.
मुंजवाड परिसरात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यातच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.
- वैभव बागुल, शेतकरी, खमताणे.
 

Web Title: Water scarcity in rural areas of Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.