बंधारपाडा येथील पाणी टंचाईझाली दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 05:50 PM2019-02-14T17:50:14+5:302019-02-14T17:50:53+5:30
सुरगाणा : गुजरात राज्याच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील सुंदरबन व बंधारपाडा गावांच्या पाणी समस्येचे निवारण गुजरात मधील नवसारी येथील सत्य सार्इं सेवा संस्थेने केली आहे. या पाड्यावरील महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. या वर्षी तर पावसाने लवकरच दडी मारल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाल अपेष्टाना सामोरे जावे लागत होते. बंधारपाडा येथील शंकर बागुल या शिक्षकाने पाणी टंचाईची समस्या पाहिली. पाणी टंचाईवर मात कशी करता येईल यासाठी या शिक्षकाने नवसारी (गुजरात) येथील सत्यसाई सेवा सामाजिक संस्थेकडे गावाची व्यथा मांडली. संस्थेने पाणीप्रश्नावर त्वरित होकार दिला.

अतिदुर्गम भागातील लोकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याचे काम सत्यसाई सेवा सामाजिक संस्थेने अतिशय तातडीने आणि उत्तम दर्जाचे काम करून दिले. संस्थेने या दोन गावांसाठी जलपरी, पाचशे मीटरवरून जलवाहिनी, मोटार कनेक्शन व तीन हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ भेट दिला. दोन्ही गावातील महिलांसाठी साड्या तर पुरुषांना टॉवेल भेट दिले. दोन्ही जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग तसेच शालेय उपयोगी साहित्य दिले. या संस्थेने गावातील लोकांना, मुलांना मिष्ठान्न भोजन दिले.
गावाला पाण्याची सोय झाल्याने ग्रामस्थ अगदी आनंदात होते. या कार्यक्र मावेळी संस्थेचे प्रमुख हसमुख पांचाळ, अन्साबेन पांचाळ, हरेश, सुशीला, सपना, हेमल आदी उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षक शंकर बागुल, प्रताप जाधव, राजेंद्र गावित, केशव महाले, काकड सापटा, सतीश इंगळे, चांभार धुळे, भुसारे, धनसिंग देवरे. जयराम सहारे, अनिल गायकवाड, भाऊराव शेवरे, मनोहर शेवरे, मुलजी गावित, परसराम गायकवाड, अनंदा गायकवाड, रसिक गायकवाड, किरण सहारे, पोलीस पाटिल प्रविण सहारे आदी उपस्थित होते.