आसखेडा गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:18 PM2018-05-16T14:18:33+5:302018-05-16T14:18:33+5:30
नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .
नामपूर ; बागलाण तालुक्यातील आसखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .
‘नदी उशासी परंतु कोरड घशासी’ या उक्तीनुसार आसखेडा गावाची आज अवस्था झाली आहे . एकेकाळी बागलाण तालुक्यात सर्वात जास्त बागायतदार गाव म्हणुन या गावची ख्याती होती . सलग तिन वर्ष गारपिट झाल्यामुळे शेती व्यवसाय संकटात सापडल्यामुळे गावाची आर्थिक परिस्थिति नाजुक झाली . लोकसंख्या चार हजाराच्या आस पास असून मतदार संख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे . गावात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता .सामान्य नागरिक हंडाभर पाण्यासाठी पायी वण वण फिरताना दिसत आहे . ग्रामपंचायत मालकीच्या दोन विहिरी आहेत .मात्र भुगर्भात जलसाठा नसल्यामुळे त्या कोरड्या पडल्या आहेत . गावाचा विस्तार लक्षात घेता दरोरोज किमान एक लाख लीटर पाण्याची दैनंदिन गरज आहे .मात्र एवढे पाणी ग्रा पंचयात मधुन उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील जनतेचा ग्रामपंचायत प्रशासनावर रोष वाढत होता . अखेर गावच्या सरपंच जया सावला यांनी आपल्या स्वत:च्या विहिरीतुन दररोज ७० हजार लीटर पाणी उपलब्ध करु ण गावाची तहान भागवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर झाली आहे. या कामी राजेन्द्र सावला , भाऊसाहेब सावला , दीपक कापडनिस यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे दिसत असून हरणबारी धरणाचे आवर्तन त्वरित सोडण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
--------------------------
स्वर्गीय विजय सावला यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या हितासाठी स्वत:च्या विहिरिचे पाणी गावास उपलब्ध करु न दिले आहे . आगामी काळात गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावरपर्यंत प्रयत्न सुरु आहेत .
- जया सावला, सरपंच, आसखेडा