नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाळा लांबणीवर
By संजय पाठक | Published: March 23, 2023 07:01 PM2023-03-23T19:01:28+5:302023-03-23T19:01:38+5:30
आज झालेल्या बैठकीत या संदर्भात महापालिकेला सूचना करण्यात आल्या आहेत.
नाशिक- अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडू शकते त्यामुळे या संदर्भात नियोजन करताना नाशिक महापालिकेला पाणीपुरवठ्यात कपातही करावी लागण्याची शक्यता आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत या संदर्भात महापालिकेला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये यंदा पाणी कपातीचे संकट आहे.
गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला असल्याने शहरावर पाणी कपातीचे सावट नव्हते. मात्र, अल निनोच्या संकटामुळे यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली या बैठकीस महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते सध्या नाशिककारांना गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र पावसाळ्याला विलंब झाल्यास सर्वच नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वी जलसंपदा विभागाने मंजूर केलेले आरक्षण गृहीत धरू नये अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आले आहेत.