जलकुंभ असूनही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:36 AM2018-02-01T00:36:38+5:302018-02-01T00:37:05+5:30

वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वासननगरचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.

 Water shortage despite water crisis | जलकुंभ असूनही पाणीटंचाई

जलकुंभ असूनही पाणीटंचाई

googlenewsNext

पाथर्डी फाटा : वीस लक्ष लिटर पाण्याचा नवीन जलकुंभ होऊनही वासननगरमधील पाण्याची समस्या सुटत नसून उलट समस्या अधिक वाढल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजन व बेफिकीर वृत्तीमुळे आणि लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वासननगरचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.
अपुºया पाणीपुरवठ्याने गेली पंधरा वर्षे हैराण झालेल्या प्रभाग क्रमांक ३१ मधील वासननगर परिसराचे शुक्लकाष्ठ अजून थांबत नाही मध्यंतरी पाण्याची वेळ बदलून जरा समाधानकारक पाणीपुरवठा होऊ लागला होता. मात्र नवीन जलकुंभामुळे समस्या आणखी जटिल झाली आहे.  वासननगरमधील पोलीस वसाहतीसमोर वीस लक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ बांधून या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंधरवड्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी घाईघाईत या जलकुंभाचे लोकार्पण करून घेतले. तत्पूर्वी या जलकुंभातून परिसरात पाणी वितरणाची चाचणी वासननगर परिसराला अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या सहन करावी लागत आहे. या परिसरात कधी पाणीच न येणे, आलेच तर अत्यंत कमी वेळ आणि कमी दाबाने येणे अशा समस्या गेल्या महिनाभरापासून कायम आहेत. यासंदर्भात महापालिका किंवा नगरसेवकांकडे तक्रारी केल्याच तर कर्मचारी संबंधित परिसरात येतात आणि पाणी कसे येते याची केवळ चौकशी करून जातात. उलट नागरिकांनाच सल्ले देऊन जातात. मात्र पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नाही. प्रभागाचे दोन नगरसेवक महापालिकेत सभापती म्हणून वर्षभर काम पाहत आहेत. एकाकडे प्रभागाबरोबरच संपूर्ण सिडको प्रभागाची जबाबदारी आहे. तर दुसºया नगरसेव- काकडे शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदाची जबाबदारी आहे.  तथापि, असे असूनही समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गंभीर होत चालल्याने महिलावर्ग त्रस्त झाला असून, पाणीपुरवठा विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

Web Title:  Water shortage despite water crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.