गोदापात्र कोरडे पडल्याने पाण्याची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 07:06 PM2019-04-06T19:06:07+5:302019-04-06T19:08:02+5:30

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.

Water shortage due to drying of Godapatha | गोदापात्र कोरडे पडल्याने पाण्याची कमतरता

गोदापात्र कोरडे पडल्याने पाण्याची कमतरता

googlenewsNext
ठळक मुद्देखेडलेझुंगे : जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.
नांदुरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रत तात्काळ पाणी सोडुन नदीलगतच्या तामसवाडी, खेडलेझुंगे, कानळद येथील बंधारे पाण्याने भरु न द्यावे अशी मागणी जोर धरु लागलेली आहे. लोकप्रतिनीधी व पाटबंधारे विभाग दरवर्षी तालुक्यातील इतर नद्यांना पाणी सोडुन वळण बंधारे भरु न देतात मग गोदावरी नदीपात्रावरच अन्याय का असा प्रश्न शेतकरी करु न लागलेले आहे. यावर्षी उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फेब्रुवारीच्या मध्यावरच गोदावरीचे नदीपात्र केरडेठाक पडलेले आहे. हातात आलेली पिके सोडून देण्यÞाची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतांना प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. सद्या लोकप्रतिनिधी जाहीर झालेल्या निवडणुकांच्या प्रचारात तर व अधिकारी आचार संहितेच्या पालनात व्यस्त आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी गोदाकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे जाणुबुजन दुर्लक्ष करत असुन याची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे.
गोई, विनिता नदी पात्रता पाणी सोडून या नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची तीव्रता कमी केली जाते. मात्र हाच न्याय गोदावरीला लावला जात नाही.
हा एकप्रकारे गोदाकाठच्या जनतेवर अन्याय केल्यासारखेच आहे. उलट गोदावरीत पाणी असतांना जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हट्टापायी गोदावरी नदीवरील वळण बंधाºयाचे दरवाजे काढुन पाण्याला मोकळीवाट करु न दिली. परिणामी आज हेच बंधारे पाण्याविना कोरडेठाक पडले आहे. घरणातील पाणी जसे काढले तसेच ते पुन्हा पाण्याने भरु न देणे गरजेचे असतांना याबाबत कुणीही बोलत नसल्याने त्याची मोठी किंमत या गावातील नागरिकांना मोजावी लागत आहे. खेडलेझुंगे, रु ई गावाला पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहीरीनेही तळ गाठलेला असल्याने गावाला ३ दिवसांनंतर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. गावाला नियमीत पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्याची कार्यवाही पुर्ण करण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षापेक्षा यावर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे चिन्ह सर्वत्र दिसत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाºया सार्वजनिक विहिरीने तळ गाठलेला आहे. त्यामुळे गावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे गोदावरीला जर तात्काळ पाणी सोडले गेले तर गोदावरीच्या किनारी वसलेल्या व परिसरातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.
- सुषमा गिते,
सरपंच, खेडलेझुंगे.
उन्हाची तीव्रता इतकी आहे की ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक व परिसरातील विहिरींनी तळ गाठलेले आहे. त्यामुळे अधिग्रहण करण्यासाठी पाण्याची विहीर शोधणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. जर जुन्या कॅनॉलला रोटेशन दिले तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.
- सी. जे. जाधव, ग्रामविकास अधिकारी, खेडलेझुंगे.

 

Web Title: Water shortage due to drying of Godapatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.