दिंडोरी तालुक्यात नियोजनाअभावी पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:37 AM2019-04-13T00:37:20+5:302019-04-13T00:37:41+5:30
दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.
दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्यात पूर्वभागातील अक्राळे, खतवड, पालखेड, आंबे दिंडोरी, खडक सुकेणा, कोराटे या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना राबवली होती. या गावांमध्ये जलकुंभसुद्धा बांधून तयार आहे; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे अजूनही योजना पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे या भागातील ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची सर्वात भीषण समस्या अक्राळे येथे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिलावर्गाला मध्यरात्री उठून कसरत करावी लागत आहे. या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे गावात असलेल्या जलकुंभात स्वखर्चाने पाणी टाकून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गावातील ग्रामस्थ आपल्या मळ्यातून गावात पाणी घेऊन येतात; परंतु ज्यांच्याकडे काही सुविधा उपलब्ध नाही, त्यांना पाणी मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे.
गावाजवळच सध्या औद्योगिक वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी पालखेड धरणावरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या योजनेत
अक्राळे गावचादेखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जवळच असणाºया मोहाडी ग्रामपंचायत हद्दीतील गणेशगावालासुद्धा ऐन एप्रिल महिन्यात तीव्र पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. गावात असणाºया नळ पाणीपुरवठा योजनेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जानोरी, मोहाडी, ओझर, साकोरे या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु गणेशगाव उंचावर असल्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्याद्वारे नळांना दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीचा आसरा घ्यावा लागतो. या विहिरीत उन्हाळ्यात अत्यल्प पाणी असल्यामुळे महिलांना पाणी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तशी कमी आहे. उन्हाळा आला की नियोजन आराखडा आखला जाता,े मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.दिंडोरी तालुक्यात चिकाडी, तळेगाव दिंडोरी, तळेगाव वणी, मानोरी, गवळवाडी, चिंचखेड आदींसह इतर गावे असून, आत्तापर्यंत पाणीटंचाईचा प्रस्ताव कोणत्याही गावाकडून आलेला नाही. पुढील काही दिवसात टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने वरील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती प्रशासन प्रयत्न करत आहे.