भोजापूरचे पूरपाणी न सोडल्यास आगामी निवडणूकांवर बहिष्कार पाणीटंचाई : फुलेनगर, दुशिंगपूर ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:53 PM2018-08-30T17:53:34+5:302018-08-30T17:53:49+5:30
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या पूर्व भागातील अतिअवर्षणग्रस्त फुलेनगर, दुशिंगपुर परिसर भोजापूरचे पुरपणी पोहचत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या पूर्व भागातील अतिअवर्षणग्रस्त फुलेनगर, दुशिंगपुर परिसर भोजापूरचे पुरपणी पोहचत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. भोजापूरचे पूरपाणी तत्काळ सोडून माळवाडी व दुशिंगपूर हे दोन्ही पाझर तलाव तातडीने भरून द्यावे. अन्यथा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा गंभीर इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाºयांना भेटून दोन्ही गावच्या शिष्टमंडळाने याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
दुशिंगपूर व फुलेनगर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव मंजूर केला आहे. पूर्व भागातील माळवाडी व दुशिंगपुर पाझर तलावामधील पाणी योजनांसाठी भोजापूर धरणातील काही पाणी आरक्षित केले जाते. याशिवाय याभागासाठी पूरपाणी सोडणे आवश्यक आहे. असे असतांना पाटबंधारे विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पूर्व भागासाठी आरक्षित असलेले पाणी आणि पूरपाणी दरवर्षी नियमाप्रमाणे मिळावे, पूरचारी फोडून पाणी वळविणाºयांवर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी शिष्टमंडळातील पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. गेल्या अनेक वर्षांपासून दुशिंगपुरचा पाझरतलाव भोजापूरच्या पूरपाण्याने भरलेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात भोजापूर धरण ओव्हरफ्लो होते, त्याचे पुरपाणी आवर्तन स्वरु पात चारी नंबर ४ ला सोडले जाते. याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्याकडे तक्रार करूनही संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करत आहे. परिसरातील शेती डोळ्यादेखत ओसाड होत आहे. तर माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहे. वारंवार निवेदने देऊन हक्काचे पाणी मिळत नसल्याने दुशिंगपूरसह फुलेनगर व परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दुशिंगपुर व फुलेनगर येथे ग्रामसभा घेऊन प्रामुख्याने भोजापूरचे पुरपाणी दुशिंगपुर बंधाºयात पोहचण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रशासनाने दखल घेवून या परिसरात पूरपाणी सोडण्यात यावे अन्यथा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना भाऊसाहेब घोटेकर, कानिफनाथ घोटेकर, भास्कर कहांडळ, नितीन अत्रे, रमेश ढमाले, विजय शिंदे, किरण अत्रे, रविकिरण पठाडे आदींनी निवेदन दिले.