पावसाळ्यातही पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:13 PM2017-08-23T23:13:01+5:302017-08-24T00:25:49+5:30
येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको : येथील प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको प्रभागात कायमच पाणीपुरवठा कमी होणे, काहीवेळा पाणीपुरवठाचा न होणे, पाइपलाइन लिकेज होणे असे प्रकार सातत्याने घडत असले तरी यास केवळ संबंधित विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रभाग २५ मधील अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत महापालिकेस कळवूनही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांंनी सांगितले.
अधिकाºयांकडून पाहणी
साबळे यांनी पाणीपुरवठा होत नाही त्या भागात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी सिडको विभागाचे पाणीपुरवठा अधिकारी संजीव बच्छाव यांनाही परिसरात बोलाविले. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात महिलावर्ग जमा झाला असल्याने त्यांनी थेट अधिकाºयांनाच जाब विचारत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली.
अन्यथा आंदोलन छेडू
महापालिकेने अभियंतानगर, शिवतीर्थ कॉलनी, इंद्रनगरी या भागात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसातही पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने याबाबत अधिकाºयांनी लक्ष घालत येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा यापुढील काळात नागरिकांना बरोबर घेत आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी सांगितले.