मुरमी गावाला पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 07:27 PM2019-03-19T19:27:21+5:302019-03-19T19:28:10+5:30
पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे.
पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून मुरमी गावाला शासनातर्फे टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या गावाला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून या योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाईने हैराण केले आहे.
दुष्काळी परिस्थितीचा फटका यावर्षी सर्वांनाच बसला आहे. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जनावरांना चारा पाणी उपलब्ध होत नसल्याने दुग्ध व्यवसाय देखील धोक्यात आला आहे.
या शिवारातील सर्वच जलसाठे कोरडे पडले आहे. विहिरी, हातपंप व बोअरवेल आटले असल्याने पाणी टंचाईत भर पडत आहे. वाडी-वस्त्यांवर तर बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या गावातील वाडी-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पुरवावे अशी मागणी होत आहे.