कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:52 PM2019-04-07T22:52:37+5:302019-04-07T22:52:55+5:30

कळवण : शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे; परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत त्यासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे शिवाय शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Water shortage, planning drought | कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ

कळवणमध्ये पाणीटंचाई, नियोजनाचा दुष्काळ

Next
ठळक मुद्देआदिवासी बांधवांची भटकंती : शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

कळवण : शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे; परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत त्यासाठी जमिनी दिल्या, त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे शिवाय शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी गेली तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होणार असल्याने या योजनेला असलेला विरोध लक्षात घेऊन तालुक्यातील जनतेला प्रथम पाणी आरक्षण करणे गरजेचे आहे.
तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन-चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे; मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे; मात्र पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगर कपारीतील आदिवासी वस्ती-पाडे या गाव-वस्तींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसर्गिक नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरविण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरडेठाक पडलेले आहेत, अशी वस्तुस्थिती कळवण तालुक्यात आहे.
(पान ६ वर)धरण उशाशी अन् कोरड घशाशी उन्हाळ्यात आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे? कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताणे, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याणे, गणोरे, सुळे, लखाणी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे.उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्षउन्हाळ्यात पाणी मागणी करणार नाही असे ठराव ग्रामपंचायतीकडून करून घेतल्याने मार्च महिन्यातच या गावांना पाणीटंचाई जाणवू लागते, तेव्हा पाण्याची भटकंती सुरू होते. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मग आदिवासी बांधवांनी उन्हाळ्यात पाण्यासाठी जायचे तरी कुठे? असा सवाल आदिवासी बांधव करतात. पुनंद प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्या अंतर्गत कालवे बांधले, ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत आहे.

Web Title: Water shortage, planning drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.