राजापूर येथे पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:17 AM2018-03-28T00:17:28+5:302018-03-28T00:17:28+5:30
येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाड्यावस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने व उन्हाची तीव्रता अधिक असल्याने विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राजापूर येथे अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती, हवा लदार वस्ती, भैरवनाथ वस्ती आदी वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. राजापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने राजापूरसह वाड्या-वस्त्यांना टॅँकरसुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या अखेरचे तीन महिने राजापूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. राजापूर हे गाव येवला तालुक्याच्या पूर्वकडे डोंगरमाथ्यावर आहे. दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने येथील शेतकºयांना पशुधनही पाळता येत नाही. जनेतला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ही येथील भीषणता आहे. त्वरित टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी राजापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.