मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

By admin | Published: May 13, 2017 12:10 AM2017-05-13T00:10:20+5:302017-05-13T00:10:46+5:30

नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.

Water shortage to the Seasam valley | मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

मोसम खोऱ्याला पाणीटंचाईची झळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नामपूर : मोसम खोऱ्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाण्यासाठी महिलांना तासन्तास तिष्ठावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. सुजलाम सुफलाम गावांपैकी एक असलेल्या नामपूर गावात आता पाणीटंचाईची ओरड सातत्याने होत असते. हरणबारी धरणाचे आवर्तन सोडा ही मागणी म्हणजे तात्पुरती मलमपट्टीच असून त्याऐवजी मोसम नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपायांची मागणी नागरिकांनी केली आहे. मोसम नदीवरच ठिकठिकाणी केटीवेअर बांधलेत तर मोसम नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बऱ्याच प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. म्हणून मोसम नदीवर केटीवेअर बांधण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.  हरणबारी धरणाचे आवर्तन येते. मोसम नदीतून ते पाणी वाहून जाते. आठ-पंधरा दिवस पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होते. पुन्हा पाणीप्रश्न तीव्र होतो. मोसम नदीतील वाळू उपसा प्रचंड वेगात आहे. सरकारी अधिकारी, पोलीस यांच्या आशीर्वादामुळे तो कुणीही थांबवू शकत नाही. वाळू संपल्यावर पाणीप्रश्नाची तीव्रता आजपेक्षाही पुढे गंभीर होईल. हरणबारीचे शेवटचे आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव, अशोक सावंत, किरण सावंत, रूपेश शहा, संभाजी सावंत यांनी केली आहे़
हरणबारी उजवा व डावा कालवा हे प्रलंबित प्रश्न आहेत. या दृष्टीने डावा व उजव्या कालव्यातून कायमस्वरूपी पाणी खेळते झाले तर मोसम खोऱ्याचा पाणीप्रश्न सुटून मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मोसमचे पूर पाणी जर तळवाडे टॅँकमधून टाकले तर या पाण्याचा फायदा शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तळवाडे टँक जर पूरपाण्याने भरून घेतला तर टेंभे, तळवाडे, खामलोण, नामपूर शिवार, मोराणे व बिजोरसे या भागातल्या विहिरींना याचा फायदा होणार आहे. तळवाडे टँकमध्ये जाणाऱ्या चाऱ्यांचे काम जलद गतीने व समजदारीने करून घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
नामपूरला पाणीप्रश्नाची तीव्रता कमी व्हावी म्हणून मोठ्या महादेवाच्या मंदिरालगत एक केटी वेअर बांधल्यास पाणीपुरवठा तर सुरळीत होईलच मात्र गावातले बोअर (जलपरी) व्यवस्थित सुरू राहतील. इंदिरानगरजवळील बंधाऱ्याची उंची वाढवल्यास येथे जलसंचय झाल्यास आजूबाजूच्या विहिरींचाही पाणीसाठा टिकून राहील म्हणून उपाय करणे गरजेचे आहे. हरणबारी धरण बांधून बरेच दिवस झालेत. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. या गाळामुळे धरणातील साठवण क्षमताही कमी झाली आहे.

Web Title: Water shortage to the Seasam valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.