आकाशपाळणे बाणगंगेच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:56 PM2020-04-08T22:56:49+5:302020-04-08T22:57:12+5:30
श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोेत्सवासाठी आलेले आकाशपाळणे लॉकडाउनमुळे बाणगंगेतच अडकून पडले होते. अशातच गंगापूर धरणातून बाणगंगेत पिण्याचे पाणी सोडल्याने लाखो रुपये किमतीचे आकाशपाळणे नदीच्या पाण्यात अडकले असून, ही पाळणे नदीपात्राबाहेर काढण्यासाठी या व्यावसायिकांची बुधवारी (दि.८) मोठी धावपळ उडाली.
कसबे-सुकेणे : श्रीक्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोेत्सवासाठी आलेले आकाशपाळणे लॉकडाउनमुळे बाणगंगेतच अडकून पडले होते. अशातच गंगापूर धरणातून बाणगंगेत पिण्याचे पाणी सोडल्याने लाखो रुपये किमतीचे आकाशपाळणे नदीच्या पाण्यात अडकले असून, ही पाळणे नदीपात्राबाहेर काढण्यासाठी या व्यावसायिकांची बुधवारी (दि.८) मोठी धावपळ उडाली.
मौजे सुकेणे येथील रंगपंचमी दत्त यात्रोत्सवासाठी आलेले विविध आकाशपाळणे हे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वाहन व रस्ते व्यवस्था उपलब्ध न झाल्याने नदीतच अडकून पडले होते. मौजे सुकेणे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व प्रशासनाने या व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तू देत मदतीचा हात दिला होता. लॉकडाउन समस्येला तोंड देत असताना या आकाश पाळणे व्यावसायिकांची बुधवारी अचानक धांदल उडाली. गंगापूर धरणातून बाणगंगा काठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने गंगापूरचे पाणी बुधवारी सकाळी मौजे सुकेणेच्या वसंत बंधाऱ्यात धडकले. यावेळी साहित्य बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ उडाली.